Home क्राईम पुण्यात काशिबाई नवले मेडिकल कॉलेज & जनरल हॉस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ क्वॅटर...

    पुण्यात काशिबाई नवले मेडिकल कॉलेज & जनरल हॉस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ क्वॅटर मध्ये सव्वादोन लाख रुपयांच्या दागिन्यांची भरदिवसा चोरी

    71
    0

    पुणे दिनांक १४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील सिंहगड रोड भागातील न-हे येथील काशिबाई नवले मेडिकल कॉलेज & जनरल हॉस्पिटल मधील स्टाफ क्वॅटर बिल्डिंग ई फ्लॅट नंबर ६ मध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांने फ्लॅटचे कुलुप चावीने उघडून घरात प्रवेश करुन २ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत.दरम्यान गजबजलेल्या मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या क्वॅटर मधून चोरी झाल्याने आता कामगार वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर या मेडिकल कॉलेज मध्ये ९ महिन्यान पासून कामगार यांना पगार संस्था चालकांने केले नाहीत.व त्यात आता घरात चोरी झाल्याने कामगारावर दुहेरी संकट आले आहे,

    दरम्यान पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी पावनेदहा ते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास काशिबाई नवले मेडिकल कॉलेज & जनरल हॉस्पिटल मध्ये असणाऱ्या नर्सिंग स्टाफ क्वॅटर बिल्डिंग ई फ्लॅट नंबर ६ चा दरवाजा बंद असताना अज्ञात चोरट्यांने फ्लॅटच्या बाहेर असलेल्या चप्पलच्या स्टॅण्ड मधून चावी घेऊन सदर फ्लॅटचा दरवाजा उघडून आत प्रवेश करुन बेडरूम मधील लोखंडी गोदरेजचे कपाट दुसऱ्या चावीने उघडून कपाटामधील लाॅकर मधून सोन्याचे दागिने मंगळसूत्र. आगंठ्या.कानातील कर्णफुले.सोन्याच्या वेढा असलेल्या अंगठ्या.असा एकूण २ लाख २२  हजार रुपायांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.दरम्यान सदर चोरी प्रकरणी गणेश शुक्ला (वय ४७ रा.काशीबाई नवले मेडिकल कॉलेज स्टाफ क्वॅटर न-हे पुणे) यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. दरम्यान यातील फिर्यादी हे काशीबाई नवले मेडिकल कॉलेज & जनरल हॉस्पिटल मध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.दरम्यान सदर चोरी ही कोणीतरी माहिती असणा-या चोरट्यांनीच केली असावी असा पोलिसांचा कयास असून पोलिस त्या पध्दतीने तपास करीत आहेत.दरम्यान या चोरी प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करीत आहेत.

    Previous articleपुण्याचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील २१ आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
    Next articleप्रयागराजमध्ये महाकुंभमेळाव्याला जाणाऱ्या भाविकांच्या बस आणि बोलेरोचा भीषण अपघातात १० ठार तर १९ जण गंभीर रित्या जखमी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here