पुणे दिनांक १४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती एक पुण्यातूनच खळबळजनक अपडेट आली असून.पुण्यातील टिंगरे नगर येथे पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे , दरम्यान पुणे शहरातील प्रत्येक पोलिस स्टेशन मधील हाद्दीत रोज वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे.दरम्यान वाहन तोडफोडीच्या घटना कमी होताना दिसत नाही.दरम्यान रात्रीच्या सुमारास टिंगरे नगर येथे पुन्हा एकदा ४ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.येथील दोन हौसिंग सोसायटीच्या आवारातील एकूण चार कारच्या काचा फोडल्या आहेत.दरम्यान या हौसिंग सोसायटी मधील सीसीटीव्ही कॅमेरा 📷 बंद असल्याने याचे फुटेज मिळाले नाही.दरम्यान सकाळी ही घटना उघडकीस आली.दरम्यान सदर वाहनांच्या तोडफोडी प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.