Home क्राईम प्रयागराजमध्ये महाकुंभमेळाव्याला जाणाऱ्या भाविकांच्या बस आणि बोलेरोचा भीषण अपघातात १० ठार तर...

    प्रयागराजमध्ये महाकुंभमेळाव्याला जाणाऱ्या भाविकांच्या बस आणि बोलेरोचा भीषण अपघातात १० ठार तर १९ जण गंभीर रित्या जखमी

    94
    0

    पुणे दिनांक १५ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळी प्रयागराज येथून खळबळजनक अपडेट आली असून.उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथे कुंभमेळाव्याला जाणाऱ्या भाविकांच्या बस व बोलेरो जीपला भीषण असा अपघात प्रयागराज जिल्ह्यात झाला असून या अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर १९ जण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी प्रयागराज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान सदर अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटना स्थळी दाखल झाले आहेत.मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम करीता शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.दरम्यान यातील सर्व भाविक हे कुंभमेळाव्याला जात असताना हा भीषण असा अपघात झाला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

    Previous articleपुण्यात काशिबाई नवले मेडिकल कॉलेज & जनरल हॉस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ क्वॅटर मध्ये सव्वादोन लाख रुपयांच्या दागिन्यांची भरदिवसा चोरी
    Next articleआजपासून महाराष्ट्रात सीबीएसई बोर्डाच्या १० वी १२ च्या परिक्षा सुरू

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here