पुणे दिनांक १६ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.नवी दिल्ली येथील रेल्वे स्टेशनवर दिनांक १५ फेब्रुवारी रोजी शनिवारी प्लॅटफॉर्म नंबर १४ व१६ वर झालेल्या चेंगराचेंगरीत ३ मुलांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे.तसेच या चेंगराचेंगरी अनेक रेल्वे प्रवासी हे गंभीररीत्य जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा सुरू असून त्यासाठी महाकुंभ मेळाव्याला जाण्यासाठी अनेक प्रवासी हे नवी दिल्ली रेल्वे स्टेशन वर मोठ्या संख्येने दाखल झाले होते.दरम्यान रात्री साडेनऊच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली त्यामुळे प्लॅटफॉर्म १४ व १६ वर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.मोठ्या प्रमाणावर एकच गोंधळ उडाला व चेंगराचेंगरी सुरू झाली.यात लहान ३ मुलांसह १८ रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.तर अनेक रेल्वे प्रवासी हे गंभीररीत्य जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या चेंगराचेंगरीच्या दुर्घटना मुळे मी व्यथित झालो असून ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे.असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे.