पुणे दिनांक १६ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट दिल्ली येथून आली असून.दिनांक १५ फेब्रुवारी शनिवारी नवी दिल्लीतील प्लॅटफॉर्म नंबर १४ व १६ वर प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्या ला जाण्यासाठी रेल्वे प्रवासी दाखल झाले होते.सदर प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन चेंगराचेंगरी मोठ्या प्रमाणावर होऊन यात चार लहान मुलांसह १४ महिला असे एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर अनेक रेल्वे प्रवासी हे गंभीररीत्य जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.आता या चेंगराचेंगरी प्रकरणी रेल्वे प्रशासनाच्या वतीने मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये.तर जखमींना २ लाख ५० हजार रुपये.तसेच सामन्य जखमींना १ लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.अशी माहिती दिल्ली रेल्वे पोलिसांनी 👮 दिली आहे.