पुणे दिनांक १६ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता हाती एक कृषी क्षेत्रामधून खळबळ जनक अपडेट आहे असून.सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात उसाच्या शेताला भीषण अशी आग लागली आहे.दरम्यान या आगीत १०० एकरापेक्षा जास्त ऊस जळून खाक झाला आहे.दरम्यान या आगीच्या घटनेत एकूण १०० ते १५० शेतकऱ्यांच्या शेतातील उस जळून खाक झाला आहे.दरम्यान या आगी बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज रविवारी पहाटेपासूनच भीषण असा अग्नितांडव सुरू आहे. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक परिश्रम करून देखील ऊसाला लागलेली आग विझत नसल्याने सर्वच शेतकरी हे या आगीच्या पुढे हातबल झाले.दरम्यान आगीने चांगलेच रौद्ररूप धारण केले आहे.अग्नीशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी शेतकऱ्यांचा शेतात दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. पण अद्याप संपूर्णपणे आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही.दरम्यान या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.