पिंपरी -चिंचवड १७ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पिंपरी -चिंचवड येथून एक खळबळजनक अपडेट आली असून.आता वाहन धारकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना सावध राहिले पाहिजे.कारण देखील तसेच आहे.पिंपरी चिंचवड येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल ऐवजी चक्क पाणी देण्यात आले आहे.पंपावर पेट्रोल भरुन काही अंतरावर गेल्यावर वाहने बंद पडली आहेत.त्या मुळे पिंपरी -चिंचवड येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पिंपरी चिंचवड येथील शाहूनगर येथील एचपी कंपनीच्या पंपावर अनेक नागरिकांनी पेट्रोल भरले दरम्यान यावेळी पेट्रोल पंपाच्या मशिन मधून ८० टक्के पाणी व २० टक्केच पेट्रोल आले आहे.