Home राजकीय आज महायुती सरकारने कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंची...

    आज महायुती सरकारने कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंची बैठकीला दांडी

    75
    0

    पुणे दिनांक १८ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मंगळवारी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्र्यांची बैठक झाली आहे.सदरच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे.या बैठकीत राज्यातील रोपवेची कामे राष्ट्रीय राजमार्ग लाॅजिस्टीक व्यवस्थापन लि.(एन‌एच‌एल‌एम‌एल) मार्फत करण्या साठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे माध्यम प्रकल्पाला १२७५.७८ कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.त्या मुळे चाळीसगाव.भडगाव.तालुक्यातील एकूण ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन मिळणार आहे. तसेच पुण्यातील मौजे एरंडवणा.येथील दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलला जागा नामपात्र १ रुपयांमध्ये शासकीय जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    दरम्यान कृष्णा -कोयना उपसा सिंचन योजनेतील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तसेच सदर योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १५९४.०९ कोटी रुपयांना प्रक्षासकीय मान्यता देण्यात आली आहे.तसेच राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी (एएनटीएफ) एकूण ३४६ नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.यासाठी २२.३७ कोटी रुपये इतका निधी खर्च राज्य सरकार करणार आहे.तसेच सहाव्या राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.आजच्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत हे अंत्यत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे.दरम्यान आजच्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी दांडी मारली आहे. दरम्यान यापूर्वी देखील झालेल्या राष्ट्रवादीच्या प्री-कॅबिनेट बैठकीला देखील धनंजय मुंडे यांनी दांडी मारली आहे.दरम्यान नेमकं कोणत्या कारणाने मुंडे अनुपस्थित होते हे अद्याप समजू शकलेले नाही.तसेच काही दिवसांपूर्वी मुंडेंच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

    Previous article‘मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना स्नानासाठी साबण द्यावा ‘
    Next articleपुण्यातील कुंजीरवाडी येथील मटका जुगार अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांचा छापा, तीन जणांच्या आवळल्या मुसक्या

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here