पिंपरी -चिंचवड १८ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट ही पिंपरी चिंचवड येथील देहूरोड येथून येत असून देहूरोड येथील गांधीनगर येथे दिनांक १३ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास वाढदिवसाला आलेल्या विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांच्यावर रिव्हालवर मधून गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती.त्यामुळे येथे एकच दहशत निर्माण झाली होती.दरम्यान गोळीबार करून फरार झालेल्या दोन जणांच्या मुसक्या देहूरोड पोलिसांनी 👮 सोलापूर येथून आवळल्या आहेत.
दरम्यान सोलापूर येथून अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे १) साबीर शेख २) साईतेजा चितमला उर्फ जाॅन या प्रमाणे आहेत .तर यातील रझिया शेख या महिलेला या पूर्वीच अटक करण्यात आले आहे तर यातील फैजाल शेख फरार झाला आहे.त्याचा शोध देखील देहूरोड पोलिस घेत आहेत.दरम्यान देहूरोड येथील गांधीनगर येथे १३ फेब्रुवारी रोजी नंदकिशोर यादव यांच्या घरी भावाच्या मुलीचा वाढदिवस होता. दरम्यान यावेळी आरोपी शाबीर शेख व साईतेजा चितमला यांचे नंदकिशोर यांच्या बरोबर किरकोळ वादातून भांडण झाले होते.दरम्यान सदरचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या गुरुस्वामी रेड्डी यांच्यावर आरोपींनी गोळीबार करून त्यांचा खून केला होता. तेव्हा पासून हे आरोपी फरार होते.आरोपींच्या अटके साठी देहूरोड पोलिसांनी 👮 ३ पथकाची नेमणूक केली होती.आज देहूरोड पोलिसांनी सोलापूर येथून या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.