पुणे दिनांक १८ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील लोणी काळभोर येथे पुणे ते सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी येथे बंदी असताना देखील खुलेआम मटक्याच्या धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू होता.दरम्यान सदरच्या मटका अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी 👮 सोमवारी छापेमारी करून ३ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.तसेच ७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान लोणी काळभोर पोलिसांनी 👮 अटक केलेल्या तीन जणांची नावे १) सरफराज शहानुर मणीयार (वय २७ रा.दत्तवाडी उरुळी कांचन ता.हवेली जि.पुणे) २) शब्बीर मन्सूर पठाण (वय ४१ रा.थेऊर ता.हवेली जि.पुणे) ३) कुणाल संजय महाडिक ( वय २४ रा.शिंदवणे ता.हवेली जि.पुणे ) असे आहे.दरम्यान या छापेमारी प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिस अंमलदार संदीप धुमाळ यांनी या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.दरम्यान पुणे ते सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी हाद्दीतील बाराफाटा येथील शिवतेज मोटार गॅरेजच्या मागे मोकळ्या जागेत खुलेआम मटका धंदा सुरू आहे.अशी माहिती खब-या मार्फत मिळाली होती.त्यानंतर पोलिसांनी छापेमारी करून वरील आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमचे कलम १२ अ प्रेमाने गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई ही लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार.तसेच रामदास मेमाणे.पोलिस हवालदार रवी आहेर.संदीप जोगदंड.व संदीप धुमाळ यांच्या सहका-यानी केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार योगेश कुंभार हे करीत आहेत.