पुणे दिनांक १८ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट राजकीय वर्तुळातून मुंबईवरून आली असून.दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात स्नान करण्या साठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साबण द्यावा.असा टोला शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.दरम्यान त्यांची पापे किती केले तरी धुतले जाणार नाहीत, प्रयागराज मधील गंगा पवित्र आहे. सांधू,संत,पुणात्मे,सामन्य माणसाला पुण्य मिळते, गद्दार, बेईमान, भ्रष्टाचा-यांना तिथे पुण्य मिळत नाही. असेही यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. दरम्यान २१ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेना गटाचे सर्व आमदार तसेच खासदार .हे उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यात त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी जाणार आहेत.