Home इतिहास बोला.. छत्रपती शिवाजी महाराज की…जय!, शिवनेरीवर शिवजयंतीचा शासकीय सोहळा सुरू

बोला.. छत्रपती शिवाजी महाराज की…जय!, शिवनेरीवर शिवजयंतीचा शासकीय सोहळा सुरू

80
0

पुणे दिनांक १९ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज १९ फेब्रुवारी बुधवार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.आज सूर्य उगवला आहे..पण आजचा हा सूर्य ☀️ ही किरणे.व ही आजची सकाळ नेहमी सारखी नाही.काहीतरी खास या आजच्या दिवसात आहे., होय १९ फेब्रुवारी.. आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.माझ्या शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये.असे धोरण अंमलात आणणारे, स्त्रियांना मानाने जगण्याचे बळ देणारे असे आहेत.आपले शिवबा राजे.प्रत्येकाच्या हृदयात बसणा-या छत्रपती शिवाजी महाराजांना दैनिक मराठी ई  डिजीटल पेपर पोलखोलनामाच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा.

दरम्यान आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी गडावर आज शासकीय शिवजयंती सोहळा पार पडणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे.शासकीय मानवंदना.लेझीम पथक.तसेच सहासी खेळांचा कार्यक्रम होणार आहे.त्यानंतर अभिवादन सोहळा होईल.शिवजंयती निमित्त आज शिवनेरीवर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान आज राज्यासह देशात सगळीकडे शिवजयंतीचा उत्सव पहायला मिळणार आहे.

Previous articleदेहूरोड गोळीबार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाकडून ७ दिवसांची पोलिस कस्टडी
Next articleजुन्नर येथे शिवनेरीवर मधमाश्यांच्या हल्ल्यात १०जण जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here