पुणे दिनांक २० फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती आलेल्या अपडेट नुसार कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण, सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.तसेच तिलोरे गावात देखील भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती तेथील गावकऱ्यांनी दिली आहे.दरम्यान हे भूकंपाचे धक्के आज गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बसले आहे.सदर भूकंपाच्या धक्क्याने या गावातील लोकां मध्ये एकच खळबळ उडाली असून.भीतीचे वातावरण गावात लोकांमध्ये निर्माण झाले आहे.पेण तालुक्यात तिलोरे.वरवणे.तसेच सुधागड तालुक्यात महागाव.व भोपेची वाडी.देऊळवाडी.कवेळीवाडी.भागातील गावांमधील जमिनीला हादरे बसले आहेत.