पुणे दिनांक २० फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक क्रिकेट 🏏 विश्वातून अपडेट आली असून.आज गुरुवारी दिनांक २० फेब्रुवारी रोजी दुपारी दुबईत चॅम्पियन ट्रॉफीतील दुसरा सामना भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळला जाणार आहे.दरम्यान मागील एकदिवसीय सामन्यात भारत हा बांगलादेशवर वरचढ आहे.दरम्यान दिनांक १९ फेब्रुवारी पासून चॅम्पियन ट्रॉफीला पाकिस्तान येथून सुरुवात झाली आहे.दरम्यान पाकिस्तानला त्यांच्याच होम पीचवर चांगलीच धोबीपछाड दिली आहे.त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान आज दुबईत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.