पुणे दिनांक २० फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे ते सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी येथील १२ फाटा येथून मारुती सुझुकी कंपनीच्या अल्टो कारमधून मोठ्या प्रमाणावर गावठी दारू घेऊन जाणार असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिस यांना मिळाल्यानंतर आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संबंधित कार आडवून त्यातून ८ कॅन्ड मध्ये असलेली एकूण २८०लिटर गावठी दारू असा एकूण २ लाख ७८ हजार रुपयांचा माल जप्त करून एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव. मुबारक जाफर गड्डे (वय ४३ रा.पाषणकर गॅस एजन्सी जवळ लोणी काळभोर पुणे) असे आहे.दरम्यान लोणी काळभोर पोलिसांना खब-या मार्फत माहिती मिळाली की मुबारक हा रोज लोणी काळभोर येथून मारुती सुझुकी अल्टो कारमधून गावठी दारू घेऊन जातो त्या माहितीच्या आधारे आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कुंजीरवाडी येथील १२ फाटा येथे संबंधित अल्टो कारवर छापेमारी करून ८ प्लास्टिकचे गावठी दारूचे कॅन्ड एकूण २८० लिटर दारू २ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान ही कारवाई लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे.पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव.पोलिस हवालदार गाडे.कर्डिले.यांनी केली आहे.दरम्यान सदर कारवाई परिमंडळ ५ चे पोलिस उप आयुक्त डॉ.राजकुमार शिंदे सहाय्यक पोलिस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले .यांच्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे.यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार गाडे.व कर्डिले. यांनी केली आहे.