पुणे दिनांक २० फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उत्तर प्रदेश येथील प्रयागराज मधील महा कुंभमेळ्यात स्नान करून परतणाऱ्या भाविकांच्या टाटा सुमो जिप व ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात ८ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर अन्य ६ भाविक हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदर अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जौनापूरच्या बदलापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भाविकांच्या टाटा सुमो जीप व ट्रक यांच्यात भीषण असा अपघात झाला आहे. दरम्यान या अपघातानंतर स्थानिक गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन यातील लोकांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.व सदर अपघाताची माहिती ही पोलिसांना दिली आहे.