पुणे दिनांक २० फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट मुंबई येथून आली असून.मुंबईतील आरे कॉलनी परिसरात आगीची मोठी घटना घडली आहे.आरे काॅलनी मधील फिल्मसिटीच्या गेट जवळ ५० पेक्षा अधिक झोपड्यांना आग लागली आहे.सदरची आगीत सिंलेडरचा देखील स्फोट झाला असून.त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणावर पसरत गेली.व झोपड्यांना व फिल्म सिटीच्या गोदामाला आग लागली आहे.दरम्यान या आगीची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकाचे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली आहे.
दरम्यान या आगी संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील फिल्मसिटी गेट ते आरे कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या लगतच्या गोदामाला व ५० पेक्षा अधिकच्या झोपड्यांना आग लागली होती.या आगीत ४० पेक्षा जास्त सिलेंडरचा स्फोट झाला व आगीने रौद्ररूप धारण केले.त्यामुळे दूरपर्यंत सर्वत्र धुराचे लोट दिसत होते.या आगीत ५० पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.तर फिल्म स्टुडिओतील काही वस्तू देखील जळाल्या आहेत. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी ४ तास अथक परिश्रम ही आग आटोक्यात आणली आहे.सदरच्या आगीत कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.अशी माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे.