पुणे दिनांक २१ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक सकाळी खळबळजनक अपडेट ही क्रिकेट 🏏 विश्वातून आली असून. भारताचा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या कारचा भीषण असा अपघात झाला असून. पश्चिम बंगाल येथील दुर्गापूर एक्स्प्रेसवेवर सदरची दुर्घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार माजी क्रिकेटपटू व कर्णधार गांगुली यांची कार ही एका ट्रकला धडकली.दरम्यान सुदैवाने या कार अपघातामधून गांगुली हा बचावला असून त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.मात्र या अपघातात अन्य दोन वाहनांचे मात्र नुकसान झाले आहे.