पुणे दिनांक २२ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी आज शनिवारी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.व मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील तपास हा अंतिम टप्प्यात आला आहे.यावेळी देशमुख कुटुंबीय व गावातील नागरिकांनी पोलिस अधिकारी यांनी हा प्रकरणात तपासामध्ये दिरंगाई केली त्या पोलिस अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली . यासंदर्भात आमदार सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यावर यातील पोलिस अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.असे सांगितले आहे.तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यातील आरोपींना जेल मध्ये व्हिआयपी वागणूक मिळत आहे.असे देखील धस यांनी यावेळी म्हटले आहे.तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालणार आहे.तसेच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात येणार आहे असे देखील ते म्हटले आहेत. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बरोबर धस यांची बैठक झाली होती.त्यानंतर धस यांच्यावर अनेकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली होती.पण त्यानंतर देखील देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोग गावाचे नागरिक हे धस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.