Home अंतर राष्ट्रीय चॅम्पियन ट्रॉफीत आज सुपरसंडे भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला दुबईत रंगणार

    चॅम्पियन ट्रॉफीत आज सुपरसंडे भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला दुबईत रंगणार

    630
    0

    पुणे दिनांक २३ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज रविवार सुपरसंडे चॅम्पियन ट्रॉफीत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकबला रंगणार आहे.दरम्यान हा सामना दुबईत दुपारी २.३० वाजता सुरू होणार आहे.यापूर्वी आयसीसी स्पर्धांमध्ये दोन्ही संघामध्ये एकूण पाच सामने खेळले गेले आहेत.त्यात तीन सामने हे पाकिस्तानच्या संघाने जिंकले आहेत. तर भारतीय क्रिकेट 🏏 संघाने दोन सामन्यांत विजय मिळवला आहे.दरम्यान भारतीय क्रिकेट संघाला २०१७ च्या चॅम्पियन ट्रॉफी सामन्याचा बदला घेण्याची संधी आहे.यापूर्वी दुबईत दोन्ही संघामध्ये दोन सामने झाले आहेत.त्यापैकी दोन्ही सामने भारतीय क्रिकेट संघाने जिंकले आहेत.दरम्यान पाकिस्तानचा संघ हा पहिला चॅम्पियन ट्रॉफीत पहिला सामना हारला आहे.आज भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव केला तर हा संघ चॅम्पियन ट्रॉफीतून बाहेर फेकला जाणार आहे.त्यामुळे ते आजचा सामन्यात चांगला खेळ करण्याची अपेक्षा आहे.तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन ट्रॉफीत बांगलादेशला पराभूत करत सामना जिंकला आहे.तर आज सलग दुसरा सामना आज जिंकून सेमीफायनल मध्ये भारतीय संघ जाण्यासाठी उत्तम असा खेळ करणार आहे.पाकिस्तान पेक्षा भारतीय क्रिकेट संघाचे पारडं जड आहे.

    Previous articleपुण्यातील ५ पर्यटक सिंधुदुर्ग येथील तारकर्ली समुद्रात बुडाले; दोन जणांचा मृत्यू ३ जणांची प्रकृती चिंताजनक
    Next articleभारत विरुद्ध पाकिस्तान आजचा हाय व्होल्टेज सामना कोणी मैदानात तर कोणी टिव्हीवर पाहतंय सामना,टीम भारताचं जबरदस्त कमबॅक

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here