पुणे दिनांक २३ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आजचा भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकबला दुबईच्या स्टेडियमवर चांगलाच रंगला आहे.दरम्यान करोडो लोक आजचा सामना पाहत आहे.विशेष म्हणजे स्टार कलाकार देखील हा सामना पाहत आहेत.साऊथ सुपरस्टार चिरंजीवी,सोनम कपूर, मैदानात बसून सामना बघत आहेत.तर अभिनेता सनी देओल तसेच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिगं धोनी हे दोघे सोबत घरी बसून टीव्हीवर सामना बघत आहेत. यांचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
दरम्यान आजच्या सामन्यात टीम भारताने चांगले कमबॅक केले आहे.टीम भारताने पाकिस्तानचा निम्मा संघ ⛺ तंबूत धाडला आहे.२०० वर ७ अशी अवस्था पाकिस्तान संघाची बिकट अवस्था भारतीय क्रिकेट संघाने केली आहे.रिजवान ४६ तर सऊद शकिल ६२ धावा काढून बाद झाले आहेत.भारताकडून हार्दिक पांड्याने २ जडेजा १ अक्षर १ तर कुलदीप २ विकेट घेतल्या आहेत.