पुणे दिनांक २४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट ही राजकीय वर्तुळातून येत असून.लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता महिलांच्या खात्यात होणार आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान मागील जानेवारीचा हप्ता देखील हा शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता.दरम्यान ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सात हप्ते लाडक्या बहिणींना मिळाल्या आहेत.दरम्यान राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर भार पडल्यानंतर आता या योजनाची निवडणूक झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.दरम्यान राज्यातील तब्बल ९ लाख महिलांना या योजनांतून अपात्र ठरविण्यात आले आहे.त्यामुळे आता लाडक्या बहिणींची धाकधूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.व आता आपल्याला पैसे मिळणार का नाही? अशी शंका आता त्यांना सतावत आहे.