Home क्राईम गजानन मारणे पुणे पोलिसांना शरण पोलिसांनी केली अटक,जोग मारहाण प्रकरण

    गजानन मारणे पुणे पोलिसांना शरण पोलिसांनी केली अटक,जोग मारहाण प्रकरण

    193
    0

    पुणे दिनांक २४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मारहाण प्रकरणी गजानन मारणे हा आता थोड्याच वेळापूर्वी पुणे पोलिसांना शरण आला आहे.पोलिसांनी गजानन मारणे याला अटक केली आहे.पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गजानन मारणे याच्यासह त्याच्या समर्थकांसह सर्वांवर कोथरूड येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मारहाण केली म्हणून मारणे व त्यांच्या सहकाऱ्यांवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करणार असे माध्यमांशी बोलताना सांगितले होते. मारहाण प्रकरणी गजानन मारणे याच्या टोळी मधील तीन जणांना अटक करून त्यांची कोथरूड येथून धिंड देखील काढण्यात आली आहे.या मारहाण प्रकरणात गुंड गजानन मारणे याच्या भाच्याचा सहभाग असून तो फरार आहे.दरम्यान मारहाण प्रकरणांवरुन भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी पुणे पोलिस आयुक्तांच्या कार्यशैलीवर  टीका देखील केली होती.

    Previous articleसाहित्य संमेलनात नीलम गोऱ्हेंची चूक, संजय राऊत यांची भूमिका बरोबर -जेष्ठ नेते शरद पवार
    Next articleमस्साजोगचे गावकरी आंदोलनावर ठाम, उद्या सकाळी १० वाजल्यापासून करणार अन्नत्याग आंदोलन

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here