पुणे दिनांक २४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दिनांक २३ फेब्रुवारी रोजी दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन ट्रॉफी 🏆 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला आहे.दरम्यान या ऐतिहासिक विजया नंतर दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडविली आहे.दरम्यान शेजारच्या देशातून काही विचित्र आवाज येत आहे, आशा आहे की ते फक्त टीव्हीच्या ब्रेकिंगचे असतील ,’ असे ट्विट दिल्ली पोलिसांनी केले आहे.’ दरम्यान भारतीय क्रिकेट संघा कडून पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर पाकिस्तान मधील क्रिकेटप्रेमी त्यांचे टीव्ही फोडल्याचे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर यापूर्वी व्हायरल झाले आहेत. तर पाकिस्तानचे माजी खेळाडू देखील टीम पाकिस्तानचा खेळाडूंवर चांगलीच आगपाखड केली आहे.