Home क्राईम राष्ट्रवादीचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या २ वर्षाच्या शिक्षेला न्यायालयाकडून स्थगिती

    राष्ट्रवादीचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या २ वर्षाच्या शिक्षेला न्यायालयाकडून स्थगिती

    58
    0

    पुणे दिनांक २४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्यांना जिल्हा न्यायालया कडून झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेच्या विरोधात नाशिक सत्र न्यायालयात दाद मागण्यात आली होती. आज नाशिक येथील सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे व त्यांच्या भावाला स्थगिती दिली आहे.१ लाख रुपयांच्या जामिनावर त्यांची आज मुक्तता केली आहे.

    दरम्यान नाशिक जिल्हा न्यायालयाने दिनांक २० फेब्रुवारी रोजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करून राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवून २ वर्षाची शिक्षा व ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.दरम्यान नाशिक येथील जिल्हा न्यायालयात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती.त्यावर हा निकाल दिला होता.दरम्यान या शिक्षेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात नाशिक येथील सत्र न्यायालयात दाद मागितली होती.त्यावर आज सत्र न्यायालयाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ सुनील कोकाटे या दोघांना एक लाख रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.त्यामुळे सत्र न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेतली आहे.त्यामुळे तात्पुरता का होईना मंत्री कोकाटे व त्यांच्या भावाला दिलासा मिळाला आहे.दरम्यान माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे आमदार व कृषीमंत्री आहेत.दरम्यान जिल्हा न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

    Previous articleपराभवानंतर दिल्ली पोलिसांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
    Next articleसाहित्य संमेलनात नीलम गोऱ्हेंची चूक, संजय राऊत यांची भूमिका बरोबर -जेष्ठ नेते शरद पवार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here