पुणे दिनांक २४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पत्रकार परिषद मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी सुरू असून दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी उध्दव ठाकरे गटात दोन मर्सिडीजच्या बदल्यात पदे मिळतात ,असं भाष्य करण्याची गरज नव्हती.दरम्यान उध्दव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत मांडलेली भूमिका १०० टक्के बरोबर आहे.असे जेष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.दरम्यान त्यांनी या बाबत आज सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान याबाबत साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी माफी मागितली आहे.असे देखील पवार यांनी म्हटले आहे.