पुणे दिनांक २५ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी पश्चिम बंगाल व ओडिशा येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून. आज सकाळी पश्चिम बंगालमधील कोलकात्यासह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.तसेच ओडिशामध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले.दरम्यान भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.६ इतकी मोजण्यात आली आहे.भूकंपाची खोली बंगालच्या उपसागरात सुमारे ९१ किलो मीटर आत असल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान यापूर्वी हिमाचल प्रदेशा मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.याठिकाणी भूकंपाची तीव्रता ही ३.७ होती.तर दिल्लीतील भूकंपा ची तीव्रता ही ४.० एवढी होती.
दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत.कोलकोता.२४ परागणा.हावडा.तसेच हुगळी.२ मिदनापूर.नादीया.बर्दवान-२ आणि आसपासच्या अनेक भागात आज सकाळी ६.१२ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.तसेच वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली नाही.