पुणे दिनांक २५ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही चाकण येथून आली आहे.चाकण येथील बहुळ येथे राहणाऱ्या वाडेकर यांच्या घरावर सोमवारी मध्यरात्री च्या सुमारास ५ ते ६ जणांनी घरातील दोन सदस्यांना चाकूच्या सहाय्याने भोसकून घरातील पेटीतून सोने व रोकड असा एकूण ६ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.सदरच्या दरोड्या नंतर या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यातील जखमी नवरा व बायको यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदर दरोडा बाबत चाकण पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी व चाकण पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी पहाणी केली आहे.
दरम्यान सदर दरोडा प्रकरणी चाकण पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी जयराम लक्ष्मण वाडेकर (वय ६५) व त्यांची पत्नी शालन जयराम वाडेकर (वय ६०) अशोक जयराम वाडेकर व त्यांची पत्नी उज्वला अशोक वाडेकर घरात झोपले असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ५ ते६ दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश करुन यातील लोकांना चाकूच्या सहाय्याने धमकावले व यातील दोघांनी त्यांना प्रतिकार केला असता अशोक व उज्ज्वला या दोघांना चाकूने सहाय्याने भोसकून घरातील पेटीतून सोने व रोकड असा एकूण ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.सदर चोरी प्रकरणी चाकण पोलिस स्टेशन मध्ये जयराम वाडेकर यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी पुढील तपास चाकण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नाथा घार्गे हे करीत आहेत.दररम्यान चाकण येथे वाडेकर यांच्या घरावर दरोडा पडल्यानंतर या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.