पुणे दिनांक २६ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली आहे.दरम्यान बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनचा आज दुसरा दिवस आहे.त्यांनी एकूण ७ मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान संतोष देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोग गावाचे ग्रामस्थ हे प्रचंड आक्रमक झाले आहेत.दरम्यान राज्य सरकारच्या वतीने यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यास बराच विलंब लावला आहे.
दरम्यान यातील आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. तसेच सरपंच संतोष देशमुख यांचा खून होण्यापूर्वी पोलिसांनी 👮 तातडीने यातील आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल केले असते तर त्यांची हत्या झाली नसती असे ग्रामस्थ व देशमुख कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्या मुळे यातील पोलिस कर्मचारी यांच्यावर सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल कराव्यात तसेच यातील फरार आरोपींना मदत करणां-या व्यक्तीवर देखील सह आरोपी म्हणून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आहे.जोपर्यत या सर्व मागण्यावर तोडगा निघणार नाही.तोपर्यत आंदोलन सुरूच राहणार आहे. दरम्यान आज दुपारी खासदार बजरंग सोनवणे या आंदोलनाला भेट देणार आहेत.काल मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती.