पुणे दिनांक २७ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील गजबजलेल्या एसटी बस स्थानकावर दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास २६ वर्षीय युवतीवर बलात्कार झाला होता.आता या घटनेला जवळपास ५४ घंटे झाल्यानंतर आता पुण्यातील पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे स्वारगेट एसटी बस स्थानकावर दाखल झाले आहेत.तसेच हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रात गाजले आहे. तसेच आज गुरुवारी थोड्याच वेळात राज्याचे गृहमंत्री राज्यमंत्री योगेश कदम हे देखील दाखल होत आहेत. कालच परिवहन कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट एसटी स्टँडवर नेमणूकीस असलेले सर्वच २३ सुरक्षा रक्षकाची कर्तव्यास अनुकूल नसल्याने त्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे.दरम्यान या सर्व घटनेची मंत्री महोदय यांनी दखल घेतली असून आज गुरुवारी मंत्रालयात तातडीने १२ वाजता बैठक होत आहे.