Home क्राईम पुण्यातील स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेला ५३ तास होऊनही आरोपी फरार पोलिसांच्या तब्बल...

    पुण्यातील स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेला ५३ तास होऊनही आरोपी फरार पोलिसांच्या तब्बल १२ टीमच्या हाती भोपळा, पोलिसांकडून आरोपीवर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

    67
    0

    पुणे दिनांक २७ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील स्वारगेट येथील शिवशाही बस मध्ये दिनांक २५ फेब्रुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपी दत्तात्रेय गाडे यांने फलटणला जाणाऱ्या २६ वर्षीय युवतीवर बलात्कार केला व नंतर फरार झाला आहे.सदर घटनेनंतर सदर युवतीने स्वारगेट पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली.त्यानंतर पोलिसांनी 👮 आरोपींची शोधमोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे.दरम्यान घटना घडल्या नंतर ३० तासांनंतर या प्रकरणाची वाच्यता झाली आहे.दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एकूण १३ पथके हे २५ फेब्रुवारी पासून आरोपीचा शोध घेत असून पोलिसांच्या हाती भोपळा लागला आहे.आता हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे.आरोपी हाती लागत नसल्यामुळे आता पुणे पोलिसांनी 👮 दत्तात्रेय गाडेला पकडून द्या व १ लाख रुपये मिळवा बक्षीस जाहीर केले आहे.याबाबतचे प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आले आहे.

    दरम्यान स्वारगेट एसटी बस स्टॅण्डवर २४ तास मोठ्या प्रमाणावर माणसांची वर्दळ असते.तसेच स्वारगेट पोलिस स्टेशन हे आगदी १०० मिटरवर आहे.तरी हा गुन्हा बलात्काराचा घडला आहे.त्यामुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.काल ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्यानंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले व पोलिस खात्यासह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान काल लगेच मोठ्या प्रमाणावर सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा स्वारगेट एसटी बस स्थानकवर नेला व शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी तर या प्रकरणी सर्वत मोठी या यंत्रणाची पोलखोल केली व स्वारगेट एसटी बस स्थानक हा लाॅजचा अड्डा कसा आहे हे दाखवून दिले.स्वारगेट बस स्थानक मधील भंगार झालेल्या बस मध्ये चादरी संतरजी महिलांच्या साड्या तसेच निरोध व दारुच्या बाटल्याचा असलेला ढीग दाखवून देऊन स्वारगेट बस स्थानक मधील सुरक्षा रक्षकच्या कॅबिन मागेच हा सर्व गंभीर प्रकार घडत असल्याचे उघडकीस आणून सदर सुरक्षा रक्षक यांच्या कॅबिनची तोडफोड केली.त्या नंतर शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्राचे परिवहन कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांना झोपेतून जागे झाले व त्यांनी स्वारगेट मधील सर्वच एकूण २३ सुरक्षा रक्षकाची सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.व आज गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता मंत्रालयात त्यांनी एक बैठक आयोजित केली आहे.दरम्यान पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडे हा पुणे जिल्ह्या मधील शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.हा शिरूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यांचा कार्यकर्ता आहे.तसेच त्यांने त्याच्या मोबाईल व्हाट्सअपवर आमदारांचा फोटो स्टेटसवर ठेवला आहे.अशी देखील माहिती आता समोर आली आहे.तसेच आरोपी गाडे यांच्यावर ७ गुन्हे दाखल आहेत.तसेच त्याला अनेक मैत्रिणी आहेत.त्या मधील भोर येथील एका मैत्रिणीला पुणे पोलिसांनी बोलवून त्याच्या बाबत माहिती घेतली आहे.तसेच त्याने अनेकांना फोन केले त्याबाबत देखील पोलिसांनी त्या लोकांशी संपर्क साधला आहे.व माहिती घेत आहेत.तसेच त्याच्या घरातील सर्व लोकांशी पुणे पोलिसांनी नोंदवला आहे.तसेच त्यांना आज पुण्यात देखील बोलाविण्यात आले आहे.गाडेवर चोरीचे गुन्हे हे शिरुर तसेच शिक्रापूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत.दरम्यान पुणे गुन्हे शाखेच्या एकूण १४ टीम या आरोपीचा शोध घेत आहेत.तसेच या टीमला पुणे ग्रामीण शिरुर पोलिस देखील आरोपीच्या शोधा करीता मदत करत आहेत.आता राज्याचे गृहराज्यमंत्री देखील आता थोड्याच वेळात पुण्यात दाखल होत आहेत.

    Previous articleपुण्यातील स्वारगेट येथील शिवशाही बसमध्ये पीडित युवतीवर दोनदा बलात्कार, मेडीकल रिपोर्ट मधून धक्कादायक माहिती समोर आली
    Next articleआज‌अखेर पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे स्वारगेट एसटी स्टँडवर दाखल झाले

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here