पुणे दिनांक २७ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात दिनांक २५ फेब्रुवारी रोजी मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एसटी स्टँडवर उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये एका २६ वर्षीय युवतीवर बलात्कार फरार झालेला आरोपी दत्तात्रेय गाडे हा शिरुर तालुक्यात उसाच्या शेतात लपल्याची माहिती पुणे क्राईम ब्रॅचच्या टीमला मिळाल्यानंतर पोलिसांनी 👮 ड्रोनच्या सहाय्याने त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान स्वारगेट एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय युवतीवर बलात्कार करून आरोपी दत्तात्रेय गाडे हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या त्याच्या घरी गेला होता.व त्यानंतर तो फरार झाला आहे.आणि त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन देखील शिरूर आहे.त्यानंतर त्यांने मोबाईल स्वीच ऑफ केला आहे.व तो तेथील उसाच्या शेतात लपल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिल्या नंतर पोलिस आता त्याचा शोध ड्रोनच्या सहाय्याने घेत आहेत.तसेच पुणे पोलिसांनी दोन डाॅग शोधक पथक देखील आरोपीचा शोध घेत आहेत. पुणे क्राईम ब्रॅचच्या पोलिसांबरोबर पुणे ग्रामीण शिरूर येथील पोलिस देखील बरोबर असून ते शोध घेत आहेत.तसेच या आरोपीच्या शोधा करीता पुणे क्राईम ब्रॅचच्या एकूण १४ टीम शोध घेत आहेत.तरी अद्याप आरोपी हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.