पुणे दिनांक २८ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट वैद्यकीय क्षेत्रा मधून आली असून.दिवसांदिवस भारतात कॅन्सरच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.यात लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंतचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत.त्यामुळे आता आरोग्य विभागाच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबईतील कामा रुग्णालयाच्या परिसरात परिचर्या प्रशिक्षण केंद्रात ‘बेसिक डिप्लोमा इन ऑन्काॅलाॅजी नर्सिंग ‘ हा एक वर्षाचा कोर्स सुरू होणार आहे.दरम्यान हा एक वर्षाचा कोर्स केल्यानंतर कॅन्सर तज्ज्ञ परिचारिका ( नर्स) तयार होतील.या एक वर्षाच्या अभ्यासक्रमात नर्सला कॅन्सर रुग्णांची शुश्रुषा कशी करावी? त्यासाठी चे प्रोटोकॉल यासह विविध गोष्टी शिकवल्या जाणार आहेत.दरम्यान अनेक मोठ मोठ्या कॅन्सरच्या रुग्णालयात असा एक वर्षाचा डिप्लोमा केलेल्या नर्स यांना नौकरीच्या संधी उपलब्ध आहेत.तसेच मोठ्या रुग्णालयाला असा कोर्स केलेल्या परिचारिकांची मोठ्या प्रमाणावर गरज देखील आहे.