पुणे दिनांक २८ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे येथील स्वारगेट एसटी स्टँडवरील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय युवतीवर बलात्कार करून फरार झालेल्या दत्तात्रय गाडे (रा.गुनाट ता.शिरुर जिल्ह्या पुणे) याच्या पुणे पोलिसांनी 👮 मध्यरात्रीच्या सुमारास दीड वाजता शिरुर तालुक्यात गुनाट येथील उसाच्या शेतातून पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान पुणे पोलिसांनी गाडेच्या शोधा करीता १०० पोलिसांचा ताफा व डाॅग स्काॅड गुनाट गावात दाखल केला होता.त्याच्या शोधा करीता १३ पथके तसेच उसाच्या शेतात ड्रोनच्या सहाय्याने शोध घेण्यात येत होता.आज मध्यरात्रीच्या सुमारास दीड वाजता शिरूर तालुक्यातील गुनाट गावात त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील शेतामधून ताब्यात घेतले आहे.दरम्यान पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकावरील शिवशाही बसमध्ये दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास २६ वर्षीय युवतीवर बलात्कार करून गुनाट गावातील उसाच्या शेतात लपून बसला होता.दरम्यान गावातील लोकांनी पोलिस प्रशासनला मोठी मदत केली आहे.गावातील जवळपास १०० युवक तसेच झोन २ क्राईमच्या टीम ड्रोनचे पथक तसेच डाॅग स्काॅड तसेच आसपासच्या जिल्ह्यातील पोलिस पथक होते असे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले आहे. दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आज शुक्रवारी त्याला पुण्यातील न्यायालयात दुपारी तीन वाजता हजर केले जाणार आहे.