Home क्राईम स्वारगेट बलात्कारातील आरोपीची फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविणार -पोलिस आयुक्त अमितेश कुमार

    स्वारगेट बलात्कारातील आरोपीची फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविणार -पोलिस आयुक्त अमितेश कुमार

    54
    0

    पुणे दिनांक २८ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील स्वारगेट येथील एसटी बस स्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय युवतीवर बलात्कार करून फरार झालेला आरोपी दत्तात्रेय गाडे याला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.आरोपीला आज शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.तसेच खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार आहे.तसेच सदर युवतीने फिर्याद दिल्यानंतर तातडीने आरोपी बाबत खात्री करण्यात आहे.तसेच या घटने मधील आरोपीला अटक करण्यास तीन दिवस लागले आहे.आम्हाला पुणे ग्रामीण पोलिसांनी व गुनाट गावातील लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले आहे.तसेच रात्री उशिरा ज्या महिलांने पोलिसांना आरोपी बाबत करेक्ट माहिती देणा-या महिलेला १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

    दरम्यान या घटनेनंतर आरोपींच्या शोधाकरीता पुणे पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी ५०० तसेच गुनाट गावातील एकूण ४०० लोकांनी प्रयत्न केला आहे.आरोपीने शेतामध्ये गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.पण तो फसला आहे.दरम्यान रात्री आरोपी पाणी पिण्यासाठी ज्या घरात गेला होता त्या महिलांने पोलिसांना त्याची करेक्ट माहिती दिल्यानंतर त्याला तातडीने अटक करण्यात आली त्यामुळे तो सापडला आहे.व त्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न सफल झाला नाही.परंतू आरोपीच्या मानेवर मेडिकल चेक‌अप दरम्यान मानेवर दोरीचे वळ दिसून आले आहे.दरम्मान आम्ही गुनाट गावात स्वतः जाऊन आरोपीला ज्या जागेवरून अटक केली त्या घटनास्थळीची पहाणी करणार आहे.तसेच आरोपीला पकडण्यासाठी गुनाट गावातील सर्व गावकरी यांनी मदत केली म्हणून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच त्या गावाला मदत करणार आहे.सदर आरोपीला पकडण्यासाठी ड्रोन व डाॅग स्काॅड यांचा देखील वापर करण्यात आला आहे.तसेच आम्हाला पुणे ग्रामीण पोलिसांची देखील मदत झाली आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

    Previous articleपुणे पोलिस आयुक्तांची ११ वाजता पत्रकार परिषद
    Next articleराष्ट्रवादीचे कृषीमंत्री कोकाटे यांचे राजकीय भवितव्य आज ठरणार! दोन वर्षांच्या स्थगितीवर होणार न्यायनिवाडा; आमदार की मंत्रीपद जाणार का राहणार? याकडे राज्याचे लक्ष

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here