पुणे दिनांक १ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील स्वारगेट येथील एसटी बस स्थानका वर मंगळवारी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास शिवशाही बसमध्ये दत्ता गाडे यांने फलटणला जाणाऱ्या २६ वर्षीय युवतीवर बलात्कार केला होता.सदर मुलीने स्वारगेट पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तब्बल तीन दिवसांनंतर व घटना घडल्या नंतर ७० तासांनंतर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून आरोपी दत्ता गाडे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान त्याला काल शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १२ मार्च पर्यंत त्याला पोलिस कस्टडी दिली आहे.दरम्यान हे बलात्काराचे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले.दरम्यान आज शनिवारी स्वारगेट एसटी स्थानकावर घटनेचा निषेध करण्या साठी महिला जागर समितीच्या वतीने ‘तिरडी आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे.आरोपीला फाशी ची शिक्षा द्या.अशी मागणी यावेळी महिला आंदोलकां नी केली आहे.तिरडी आंदोलनच्या माध्यमातून महिलांनी महायुती सरकारचा देखील निषेध व्यक्त केला आहे.