पुणे दिनांक १ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.कोल्हापूर न्यायालयाने प्रशांत कोरटकरला मोठा दिलासा दिला आहे.त्याला न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरने इतिहासाचे अभ्यासक व लेखक इंद्रजित सावंत यांना २४ फेब्रुवारी रोजी फोन करून जीवेठार मारण्याची धमकी दिली होती.तसेच तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल देखील अवमान कारक शब्दाचा वापर केला होता.दरम्यान प्रशांत कोरटकर हा मुळचा राहणारा नागपूर येथील असून कोल्हापूर येथे इंद्रजित सावंत यांनी कोरटकर विरोधात पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी नागपूर येथे त्याच्या निवासस्थानी गेल्यावर तो नागपूर येथून फरार झाला आहे.दरम्यान तो मध्यप्रदेश येथे लपून बसला आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.कोल्हापूर व नागपूर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.दरम्यान आता याबाबत पुढील सुनावणी कोल्हापूर येथील न्यायालया मध्ये दिनांक ११ मार्चला सुनावणी होणार आहे.अशी अधिकृत सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.