पुणे दिनांक २ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र विधीमंडळ अर्थसंकल्पील अधिवेशना च्या पूर्वसंध्येला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम पार पडला.याचा फोटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे.पण विरोधकांनी आजच्या चहापाना च्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.दरम्यान उद्या सोमवारी दिनांक ३ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.दरम्यान उद्याच्या अधिवेशन मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने अनेक मुद्दे येणार आहेत.यात लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा १हजार ५०० रुपयांचा हप्ता मिळालेला नाही.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे व मोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करण्याची शक्यता आहे.तसेच पुण्यातील स्वारगेट येथील एसटी स्थानक मधील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय युवतीवर बलात्कार याप्रकरणी देखील पुण्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.तसेच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणात छेड काढणारे मुले ही मुक्ताई नगर मधील शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे विरोधकांना आता हा मुद्दा मिळाल्याने ते सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार हे नक्की तसेच पुणे व जळगाव येथील मुक्ताई नगर येथील घटनेने राज्यात अधिच वातावरण तापले आहे.