पुणे दिनांक २ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दुबईत झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीत आज झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव केला आहे.भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड संघाला २५० धावांचे आव्हान दिले होते.हे आव्हानांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ २०५ धावा करु शकला आहे.आजच्या सामन्यात स्पिनर वरुन चक्रवर्ती यांने ५ विकेट घेतल्या आहेत.दरम्यान आता चॅम्पियन ट्रॉफीत भारत.न्यूझीलंड.व ऑस्ट्रेलिया.आणि साऊथ आफ्रिका या चार संघांनी सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे.त्यानंतर आता सेमीफायनलचे चित्र स्पष्ट झाले आहे.दरम्यान सेमीफायनल मध्ये भारताचा सामना ४ मार्चला दुबईत ऑस्ट्रेलिया संघा सोबत होणार आहे.तर न्यूझीलंडचा सामना साऊथ आफ्रिका बरोबर ५ मार्चला पाकिस्तान मधील लाहोर येथील स्टेडियमवर होईल.तर फायनल मुकाबला हा ९ मार्चला होईल.