पुणे दिनांक २ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक क्रिकेट 🏏 विश्वातून अपडेट आली असून.आज रविवार दिनांक २ मार्च चॅम्पियन ट्रॉफीचा शेवटचा ग्रुप सामना आज भारत व न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे.दरम्यान विजेता संघ गट फेरीत अव्वल स्थानावर राहील आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना करेल.यातील पराभूत संघाचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होईल.दरम्यान नाणेफेक दुपारी दोन वाजता होईल.दुपारी २.३० वाजता दुबई येथील स्टेडियमवर हा सामना सुरू होईल.
दरम्यान आज होणा-या सामान्यात टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. दरम्यान पाकिस्तान विरुद्धच्या सामान्यात भारतीय क्रिकेट संघाचा फास्ट बाॅलर शमी याला पायाचा त्रास झाल्याने त्याला आज विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी अर्शदीप सिंहला संधी मिळू शकते.तसेच पाकिस्तानचा सामन्यात रोहित शर्मा याला दुखापत झाल्याने रोहितला देखील विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान टीम इंडियाची न्यूझीलंड संघा विरुद्धची आकडेवारी आज समोर आली आहे.त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे.टीम इंडियाने चॅम्पियन ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत न्यूझीलंड संघा विरुद्ध एकदाही विजय मिळवला नाही.दरम्यान खरं तर तसे पाहता चॅम्पियन ट्रॉफीत टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड संघ हा एकदाच आमनेसामने आले आहेत.यात मात्र न्यूझीलंड संघाने भारतावर विजय मिळवला आहे. तसेच संघात जर खरेच बदल झाले तर इंडियाची चिंता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.