पुणे दिनांक २ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळी पुण्यातून एक खळबळ जनक अपडेट आली असून.पुण्यात काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न हा जाणिवपूर्वक सुरू आहे.पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.भारती विद्यापीठ परिसरातील भारत नगर येथे १० ते १२ गाड्या फोडल्या आहेत.त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपासून पुण्यात गुंडाकडून गाड्यांची तोडफोड करण्याचे सत्र सुरूच आहे.दरम्यान मागील महिन्यांमध्ये पुण्यातील येरवडा.कोंढवा.तसेच फरासखाना या भागात वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली होती.आता पुन्हा एकदा आता भारती विद्यापीठ परिसरातील भारत नगर येथे अज्ञात व्यक्तीने १० ते १२ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.या तोडफोडी मध्ये रिक्षा तसेच टेम्पो.आणि चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.त्यामुळे भारती विद्यापीठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरू आहे.