पिंपरी -चिंचवड ३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही चाकण येथून येत आहे.चाकण पोलिस स्टेशनच्या हद्दीत मागील आठवड्यात एका घरावर दरोडा पडला होता.दरम्यान पुन्हा काही दरोडेखोर हे पिंपरी -बहुळ या भागात दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याने रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी ट्रॅप लावला असता दरोडेखोराकडून पोलिस उपायुक्त व सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.यावेळी पोलिसांनी 👮 दरोडेखोरावर प्रत्युत्तरात रिव्हाॅलवर मधून फायर केला असता यात एक दरोडेखोर जखमी झाला आहे.त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलिसांनी 👮 ताब्यात घेतले आहे.
दरम्यान दरोडेखोरांचा हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिस उपायुक्तांचे नाव शिवाजी पवार आहे तर दुसरे जखमी झालेल्या सहायक पोलिस निरीक्षक यांचे नाव प्रसन्न जराड असं आहे.दरम्यान मागील काही दिवसां मध्ये चाकण परिसरात दरोडेखोराकडून दरोडा टाकण्याचे प्रकार वाढले म्हणून पोलिसांनी 👮 या भागात काल रात्री साडेबाराच्या सुमारास या भागात गस्त घालत असताना दरोडेखोराकडून धारदार शस्त्राने पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे.यावेळी पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांनी प्रत्युत्तरात रिव्हाॅलवर मधून फायर केला असता यात एका दरोडे खोर जखमी झाला आहे.त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर दुसरा हा अंधाराचा फायदा घेऊन पळून जात असताना त्याला पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान चाकण येथील बहुळ येथील दरोडा प्रकरणात प्रमुख आरोपी चंदर भोसले व मिथुन चंदर भोसले हे पोलिसांच्या रडारवर होते.या भागात हे दरोडेखोर पुन्हा दरोडा टाकणार असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी बहुळ या ठिकाणी ट्रॅप लावला होता.यातील सचिन भोसले हा हा अंत्यत सराईत गुन्हेगार आहे.त्याच्यावर एकूण ९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.