पुणे दिनांक ४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या नंतर मराठा समाजाचे आंदोलक व मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले असून त्यांनी म्हटले आहे की सगळ्या आरोपींना भर चौकात फाशी देऊन गोळ्या घातल्या पाहिजेत.असे त्यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. आता राजीनामा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत एकमेकांवर ढकला -ढकली केली ती आतातरी करु नये.इतकी क्रूर हत्या आता प्रर्यत महाराष्ट्रात झालेली नाही.दोघांनी देखील उभ्या आयुष्यात अशी घटना पाहिली नसेल.तुम्ही सरकार मध्ये आहेत.म्हणून आरोपींना पाठिशी घालता म्हटल्यावर जनतेचा रोष तुम्हाला परवडणार नाही.असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.