पुणे दिनांक ४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आज मंगळवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.दरम्यान काल सोमवारी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील फोटो मोठ्या प्रमाणावर सर्व मिडिया वर प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली त्यामुळे काही सामाजिक संघटनांनी बीड जिल्हा बंदची घोषणा केली होती.आज सकाळ पासूनच बीड शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.नेहमीप्रमाणे आज बीड मधील बाजारपेठा गजबजल्या नाहीत.दरम्यान मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करताना आरोपींनी काळजी पिळवटून टाकणारे फोटो माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.आणि या हत्याकांडा मधील आरोपी वाल्मीक कराड हा माझा कार्यकर्ता आहे.व माझा माणूस आहे.असे छातीठोकपणे सांगणा-या मंत्री धनंजय मुंडे यांना महायुतीचे सरकार पाठीशी घालत आहेत.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील हे धनंजय मुंडे यांची पाठराखण करत आहेत.दरम्यान आता संपूर्ण महाराष्ट्रातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.आणि सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे.विरोधक आज सत्ताधारी महायुतीवर हाऊस मध्ये तुटून पडणार आहे.त्यामुळे आज धनंजय मुंडे हे मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.