पुणे दिनांक ४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई येथील विधानभवनावरुन खळबळजनक अपडेट हाती आली असून.महायुती के दो गुंडे कोकाटे आणि मुंडे.अशी घोषणाबाजी करत विरोधक आता विधानभवनाबाहेर आंदोलन करत आहेत.दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे.आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुसरे मंत्री माधवराव कोकाटे यांच्या देखील राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत.यात विरोधक यांच्या बरोबर आता सत्ताधारी नेतेमंडळी देखील आंदोलन करत आहेत.तसेच आमदार अबू आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी करत आहेत.दरम्यान अबू आझमी यांनी म्हटले होते की औरंगजेब उत्तम प्रशासक होते.त्यावर देखील आज विधानभवना बाहेर आंदोलन करण्यात आले आहे.