पुणे दिनांक ४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील फोटो काल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाल्या नंतर झोपलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्री खडबडून जागे झाले व तातडीने सागर बंगल्यावरुन देवगिरीवर पोहोचले त्यावेळी देवगिरी बंगल्यावर अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व खासदार प्रफुल्ल पटेल व स्वतः कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे देखील त्यावेळी उपस्थित होते . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा असं अजित पवार यांना सांगितले . दरम्यान काल मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील फोटो मोठ्या प्रमाणावर माध्यमांवर प्रसिद्ध झाल्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्रीच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असा आदेश दिला आहे. अशी माहिती आता समोर येत आहे.मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी सांगणार का ? व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे हे राजीनामा देणार का ? आज थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होईल.