पुणे दिनांक ४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची मोठ्या प्रमाणावर लाट उसळत आहे यामध्ये हत्या प्रकरणातील आरोपींनी सरपंच संतोष देशमुखांसोबत अमानवी कृत्य करताना दिसत आहे.हा फोटो आणि व्हिडिओ पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.दरम्यान राजकीय वर्तुळातून देखील संतापजनक प्रतिक्रिया उमटताना पहायला मिळत आहेत.दरम्यान यातील सर्व आठही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान या सर्वा घडामोडी रात्री पासूनच आता वेग आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीनेच रात्री अजित पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले .व त्यांच्या बरोबर चर्चा केली आहे.यावेळी अजित पवार यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे.व धनंजय मुंडे.खासदार प्रफुल्ल पटेल.हेही