पुणे दिनांक ४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे काही भयवाह फोटो काल सर्वच माध्यमांवर प्रसिद्ध झाले आहेत.सदरचे फोटो बघून संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.सदरचे फोटो पाहून सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान राजकीय पक्षांच्या बळामुळेच मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हालहाल करून यातील आठ आरोपींनी अतिशय निर्घृणपणे खून केला आहे. असे कृत्य राक्षस देखील करत नाही.असे म्हटले जाते.दरम्यान या हत्याचे फोटो समोर आल्या नंतर आता मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे तातडीने मस्साजोग गावात देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी सकाळीच दाखल झाले आहेत.दरम्यान यावेळी मनोज जरांगे यांना पाहून धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले व ते त्यांच्या गळ्यात पडून रडत होते.एवढे सर्व होऊन देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहेत.दरम्यान धनंजय मुंडे यांच्या टोळीकडून मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे.हे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील असे मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे .