पुणे दिनांक ५ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही बीड जिल्ह्यातून आली असून.बीड जिल्ह्यामुळे आता महाराष्ट्राची बदनामी सर्व देशभर होत आहे.तसेच मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे.बीड जिल्ह्यात एका व्यक्तीला टोळक्याकडून बॅटने अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे.दरम्यान सदरची घटना ही शिरुरच्या बावी गावातील घटना आहे.आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांचे हे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान हा मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स हॅंडलवर शेयर केला आहे.यात एका व्यक्तीने पीडीत व्यक्तीचे पाय धरले आहेत.तर दुसरा व्यक्ती पायाच्या तळव्याला लाकडी बॅटच्या सहाय्याने जोरात मारहाण करीत आहे.सदर मारहाणीत संबंधित व्यक्तीला भयंकर वेदना होऊन ती व्यक्ती ओरडत आहे.तरी हे कार्यकर्ते त्या व्यक्तीला पुन्हा मारहाण करत आहेत.असे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे.दरम्यान सदरचा व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून आता बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत हे संबंधित व्यक्तींवर कारवाई करणार का ? हे पहावे लागणार आहे.