पुणे दिनांक ६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.पुणे जिल्ह्यातील यवत रेल्वे स्टेशन जवळील चव्हाण वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोराकडून दरोडा टाकण्यात आला आहे.यात दरोडेखोराकडून घरातील सदस्यांना मारहाण करण्यात आली आहे.तर दरोडेखोराकडून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य सदस्य देखील जखमी झाले आहेत.सदरच्या दरोडा प्रकरणी यवत पोलिस व पुणे ग्रामीण पोलिस हे दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.दरम्यान दरोडेखोराकडून मारहाण झालेल्या चव्हाण कुटुंबियांना उपचारासाठी यवत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती मिळत आहे.